गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…

चंद्रकांत पाटील यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका

0
115

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख झाल्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

याच्यामागे कोण आहे, हे भाजप नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, असे म्हणत पाटील यांनी देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर  रावेरच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत चुकीचा उल्लेख केल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर    अवघ्या १२ तासांमध्ये भाजपने ही चूक मान्य करत यात सुधारणा केली.