कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती खालावली. त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खंचनाळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आहे. खंचनाळे हे मागील चार दिवसांपासून आजारी आहेत. दिल्ली येथे १९५९ मध्ये झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी किताब मिळवला होता.

खंचनाळे हे मुळचे सीमाभागातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा गावचे आहेत. ते कित्येक वर्षांपासुन कोल्हापुरात वास्तव्यास आहेत. विविध कुस्ती स्पर्धेत त्यांनी कोल्हापूरचा डंका देशभर वाजवला. नवीन मल्लांना तालमीत धडे देण्याचे काम ते करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्लांनी विविध कुस्ती मैदाने गाजवली आहेत. सध्या त्यांची प्रकृती खालावली असल्याने उपचार घेत आहेत.