* एकनाथ शिंदेंना ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी विधीमंडळ गटनेता म्हणून निवडले गेले.

* २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेचे युती झाली; परंतु सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्थापन करण्यात आले.

* बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना बाजूला ठेवत महाविकास आघाडी करण्यात आली. त्याचा आम्हाला वैयक्तीक पातळीवर त्रास सहन करावा लागत आहे.

* अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यामुळे सरकारवर होणाऱ्या आरोपांमुळे शिवसेना आमदरांमध्ये नाराजी आहे.

* देशमुख-मलिकांवरील आरोपांमुळे सरकारची कोंडी झाली आहे.

* वेगळ्या विचारधारासोबत आल्याने बाळासाहेबांच्या विचाराला हरताळ फासला आहे.

* शिवसेनेची विचारधारा मराठी माणसांसाठी आहे, त्यात आम्हाला गेली अडीच वर्ष झालं तडजोड करावी लागत आहे.

* सत्तेसाठी पक्षाची विचारधारा बाजूला ठेवली जात आहे. हिंदुत्वाची भूमिका असलेल्या बाळासाहेबांना स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार पाहिजे होते.