पुण्य प्रवाह अपार्टमेंट येथे हाय वेल्स अल्टिमा सौर उर्जा प्रकल्पाचे अनावरण…

0
60

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागाळा पार्क येथील पुण्य प्रवाह अपार्टमेंट-सोसायटी येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ सभासदांकडून वृक्षारोपण करण्यात आले. याच अनुषंगाने कोल्हापुरातील निवासी प्रकल्पामधील सर्वात मोठे हाय वेल्स अल्टिमा सौर ऊर्जा प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी हायवे अंतीमाचे डायरेक्टर इंद्रजीत जाधव, विकास राऊत, राम सिन्हा ग्रुपचे सचिन ओसवाल, विकेश ओसवाल आणि अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यासाठी पुण्य प्रवाह कमिटीने पुढाकार घेऊन स्वखर्चाने प्रकल्प पूर्णत्वास नेला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष रितेश जोशी सेक्रेटरी प्रीतम चौगुले खजिनदार डॉक्टर दिग्विजय पाटील, बिलाल तहसीलदार, अमेय भांबुरे, रविराज पारगावकर, दीपक बोधे,  प्रकाश कापसे, अनिकेत देवघरे, पियुशा लाईकर यांच्यासहीत अन्य सभासद उपस्थित होते.