सीपीआरमध्ये घडलेल्या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन : राहूल बडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सीपीआरमधील ट्रॉमा आयसीयूमधील एका कक्षात इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉट सर्कीट होवून दुर्घटना झाली. या घटनेच्या चौकशीसाठी डॉ. बी. वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल बडे यांनी दिली.

बडे म्हणाले, ‘ट्रॉमा आयसीयूमध्ये एकूण १५ रुग्ण दाखल होते. त्यापैकी आगीची घटना घडलेल्या कक्षात चार रुग्ण होते. सेवेवर असलेले डॉक्टर्स, नर्सेस, वर्ग चार कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे सुरक्षा रक्षक यांनी प्रसंगावधान राखून कोरोनाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून धाडसाने अत्यंत थोड्या वेळात येथील एकूण सर्व १५ रुग्ण अन्य कक्षामध्ये स्थलांतरित केले. या दरम्यान कोणत्याही रुग्णास कुठल्याही प्रकारची दुखापत किंवा जिवीत हानी झाली नाही.

ट्रॉमा आयसीयूमधील तीन कक्षामध्ये एकूण १५ रुग्णांपैकी ९ रुग्ण हे एन.आय.व्ही.वर होते. उर्वरित रुग्णांना मास्कद्वारे ऑक्सिजन पुरविण्यात येत होता. रुग्ण स्थलांतर दरम्यान योग्य काळजी घेवून इतर आयसीयूमध्ये स्थलांतरित केले. स्थलांतरित केलेल्या रुग्णांना आयसीयूमध्ये योग्य उपचार तातडीने दिले. उपचार सुरु असताना काही काळानंतर जे रुग्ण अती गंभीर होते. त्यापैकी तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये ट्रॉमा आयसीयूमधील घटना घडलेल्या कक्षातील एक व इतर कक्षातील दोन असे एकूण तीन अतिगंभीर रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण दाखल झाल्यापासून अतिगंभीर होते. त्याबाबत संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना वेळोवेळी कल्पना देण्यात आली होती. मृत्यू झालेल्या तीनही रुग्णांच्या फुफूसामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग असल्याचे दिसून आले होते. तसेच एन.आय.व्ही. असताना सुध्दा त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी राहत होते. त्यांना इतर व्याधीग्रस्त जसे उच्च रक्तदाब, अशा प्रकारचे आजार होते. उर्वरित रुग्णांचे उपचार आयसीयूकक्षामध्ये सुरु असून रुग्ण स्थिर आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता डॉ. बी.वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.’

Live Marathi News

Recent Posts

कोरोना अपडेट : दिवसभरात २२१० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल…

8 hours ago