हेमंत नगराळे राज्याचे नवे पोलीस महासंचालक

0
87

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रात प्रतिनियुक्तीवर बदली झाली आहे. त्यामुळे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकड़े देण्यात आला आहे. सध्या ते लीगल आणि टेक्निकल विभागाचे डीजी आहेत. आज (गुरूवार) दुपारी ३.३० वाजता ते अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार आहेत. 

सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्यानंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यासाठी संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश सेठ यांची नावे चर्चेत होती. परंतु नगराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  नगराळे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी २०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता.