तुळशीविवाहाच्या माध्यमातून अनाथांना मदत : साहेबराव काशीद यांचा स्तुत्य उपक्रम…

0
75

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काशिद विविध माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते भटजीची उणीव भरुन काढत कोल्हापुरात १०० ते १५० तुलसी विवाह लावून त्यातून मिळणारी मदत अनाथाश्रम, सामाजिक संस्थांना देत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या तुलसी विवाहातून काशीद यांनी अवनी संस्थेच्या मुलांना फराळासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचप्रमाणे कुष्ठरोग्यांना आर्थिक मदत तसेच खेळणी विक्री करणाऱ्या लहान मुलांना फराळाचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. याबद्दल काशीद यांचे कौतुक होत आहे.