भुदरगड तालुक्यातील पूरग्रस्तांना ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा मदतीचा हात…

0
168

गारगोटी (प्रतिनिधी) : आर्ट ऑफ लिव्हिंगने आज (गुरुवार) भुदरगड तालुक्यातील अनेक गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.  यावेळी तालुक्यातील अनेक गावांत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करण्यात आले.

श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने आज दिवसभरात भुदरगड तालुक्यातील कूर येथे ६१, कोनवडे ९, महालवाडी ५,  गारगोटी ६, शेणगाव ३०, आकुर्डे गावांतील ३ अशा पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करणेत आले,

यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या साधक डॉ. अनिमा दहीभाते, निखिल अग्रवाल, ऋषिकेश माने, प्रा. आनंद चव्हाण, कूरचे सरपंच दत्तात्रय हळदकर, उपसरपंच सुरेंद्र धोंगडे, भुदरगड तालुका संघाचे संचालक प्रा. हिंदुराव पाटील, राजन कोनवडेकर, महालवाडी सरपंच सात्ताप्पा निकाडे, गारगोटी सरपंच संदेश भोपळे आदी उपस्थित होते.