गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील पूरग्रस्त बांधव हे आपलेच आहेत. त्यामूळे मानवतावादी भुमिका ठेवून या पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करा. असे आवाहन भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय मोरे यांनी केले. ते भुदरगड तालुक्यातील कोनवडे येथे पूरग्रस्तांना  पोलीस स्टेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपावेळी बोलत होते. यावेळी सरपंच राणी पाटील उपस्थित होत्या.

यावेळी भुदरगड तालुका शेतकरी संघाचे संचालक प्रा. एच. आर. पाटील यांनी, भुदरगड पोलीस स्टेशनने संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही मदत येथील पूरग्रस्तांना दिली, त्या मदतीचे मुल्यमापऩ करता येणार नाही. जनतेला कायद्याची भाषा शिकवणाऱ्या पोलीसांनाही याबद्दलचा कळवळा असतो हे यातून दिसून आल्याचे ते म्हणाले.

यावेळी सपोनि. सतीश मयेकर, अमित देशमुख, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, सतिश पाटील, दिगंबर बसरकर, टी.एस. सुर्यवंशी, उपसरपंच सुभाष पाटील,  पांडूरंग पाटील, आनंदराव पाटील, पांडूरंग चव्हाण दयानंद सुतार, रवि पाटील आदि उपस्थित होते.