गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता…

0
167

मुंबई (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ आज (रविवार) मध्यप्रदेश आणि रात्रीपर्यंत आंध्रप्रदेश, ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे. ताशी 85 ते 95 किमी प्रतितास वेगानं हे वादळ किनारपट्टीच्या दिशेनं मार्गक्रमण करत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे येत्या काही तासांत आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यातील किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने याठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.