धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड येथे तुळशी धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणाचे मापी वाचक बळवंत मगदूम यांनी आज (गुरुवार) सायंकाळी पाच वाजेपर्यंतची पाणीसाठ्याची  माहिती ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना दिली.

मगदूम यांनी, धरणाची पाणी पातळी ६१०.३७ मीटर असून पाणी साठा ६७.२१२ द.ल.घ.मी आणि २३७३.५०८ द.ल.घ.फू इतका झाला आहे. गेल्या बारा तासात २९२ मिमी. पावसाची नोंद झाली असून एक जूनपासून आजपर्यंत २०१९ मिमी. इतका पाऊस झाला आहे. लोंढा लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून या धरणात ४०० क्यूसेक्सने पाणी येत असून धरणक्षेत्रातील पावसाच्या पाण्याबरोबरच मुख्य तुळशी नदीतून ३६०० क्यूसेक्स पाणी धरणात जमा होत असल्याचे सांगितले.