कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्हयात परतीच्या पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. यामुळे नदी, नाले, धरणातील पाण्यात वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. तर अलमट्टी धरणातून १२८६३ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

चिकोत्रा, चित्री, जांबरे, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व कोदे लघू पाट बंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये असा : तुळशी ९१.९२, वारणा ७७९.३५, दूधगंगा ६७९, कासारी ७७.४४, कडवी ७०.५८, कुंभी ७६.०९, पाटगाव १०४.५७, चिकोत्रा ४३.५, चित्री ५२.४८ असा आहे.