गगनबावडा तालुक्यात पावसाचा हाहाकार : कोल्हापूर-गगनबावडा रस्ता वाहकतूकीसाठी बंद

0
380

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यात गेली दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे कुंभी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर मार्गेवाडी ते शेणवडे दरम्यान मांडुकली गावचे हद्दीत सुमारे पाच ते दहा फूट इतके पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कुंभी धरणातून ४२० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सूरू केला आहे. अंदूर, कोदे आणि वेसरफ या छोट्या तालावांच्यामधूनही पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणात होत असलेमुळे पुराच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गगनबावडा तहसिलदार आणि पोलिस ठाण्याकडून नागरिकांनी घरीच राहण्याचे अवाहन केले आहे.

तर गगनबावडा तालुक्यात आज (गुरुवार) २६५ मिमी. तर साळवण क्षेत्रात २८३ मिमी. अशी एकूण ५४८ मिमी.पावसाची नोंद झाली आहे.  आजची सरासरी २७४ मिमी.पावसाची नोंद झाली आहे. तसेच आजअखेर २५०२.५० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.