गडहिंग्लजमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस…

0
291

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमध्ये आज (रविवार) दिवसभर फारच उष्मा जाणवत होता. परंतु, दुपारी चारनंतर ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या वळीव पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र, सध्या काजू, आंबा यांचा हंगाम सुरू असून वळीव पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.