पन्हाळा (प्रतिनिधी) : चक्रीवादळाच्या जोरदार वाऱ्याने पन्हाळा शहर आणी परीसरात ठिकठीकाणी वृक्ष कोसळल्याने विद्युत पुरवठा दिवसभर खंडीत झाला तर मुसळधार पावसाने परीसर भितीच्या छायेखाली राहीला होता.

सकाळी जुनाट मोठे सुरुचे झाड वनविभागाच्या कार्यालया पाठीमागील भागात उन्मळुन पडले केवळ दैव बलवत्तर म्हणुन शेजारी राहणारे लोकमतचे पन्हाळा बातमिदार नितीन भगवान यांचे घर वाचले आन्यथा मोठा अनर्थ घडला असता, दुपारी पासुन मुसळधार पावसाला  सुरवात झाली आसुन जोरदार वाऱ्याने कांही घरावरचे छप्पर उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाऊस आणी वारे यामुळे भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.