Published November 12, 2020

टोप (प्रतिनिधी): सामाजिक बांधिलकी जपत इतराना सढळ हाताने मदत करण्यात कोल्हापूरकर हे राज्यात भारी असल्याचे प्रतिपादन करवीर विभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. ते शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वतीने स्मॅक सभागृहात आयोजित विशेष सन्मानपत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उद्योजक सुरेंद्र जैन, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील आणि स.पो.नि. किरण भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अमृतकर म्हणाले की, कोल्हापूरच्या जनतेची स्तुती जेवढी करता येईल तेवढी कमीच आहे. गेल्या वर्षी पंचगंगा नदीला आलेल्या महापुर आणि या वर्षी कोरोनाने सर्वत्र कहरच केला होता. अशा परिस्थितीत एकाद्याला मदतीचा हात देवून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सामाजिक बांधिलकी कशा प्रकारे जपता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूरवासिय आहेत. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी दवाखाने, पोलीस प्रशासन, शासकीय यंत्रणा यांना मदतीचा हात दिला. या महामारीचा फैलाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक गाव एक गणपती, धार्मिक कार्यक्रम, जत्रा, सण, उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याने आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली. असे अमृतकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कोविडच्या महामारीमध्ये विशेष कामगिरी बजावलेल्या पत्रकार, सरपंच, उद्योजक, पोलीस पाटील यांचा प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच शशिकांत खवरे स.पो.नि. रमेश ठाणेकर, फौजदार अतुल लोखंडे आणि मान्यवर उपस्थित होते.

September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023