दिल्ली : हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयविकाराशी संबंधित शस्त्रक्रिया अत्यंत महागड्या असतात; मात्र आता हृदय शस्त्रक्रिया स्वस्त होणार आहे.

यामुळे आर्थिकदृष्या दुर्बल असलेल्या रुग्णांना उपचाराच खर्च झेपत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार करुन घेणे शक्य होत नाही. हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या स्टेंटच्या किमती लवकरच कमी होणार असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जीवनावश्यक औषधांच्या यादीत स्टेंटचा समावेश केला आहे. स्टेंटच्या किमती कमी झाल्यामुळे हृदय शस्त्रक्रियेचा खर्च कमी होणार आहे.