नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (मंगळवार) संयुक्त पत्रकार परिषद घेत कोरोना संबंधीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर घोषणा केली. संशोधकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणाल लसींचे उत्पादन करण्यात येणार आहे. तसेच तीन लसींना परवाना देण्याचा विचार सरकार करत असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

या लसींपैकी सर्वांना किंवा एकाला तरी लवकरात लवकर परवाना मिळण्याची शक्यता आहे, असे निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले. ३ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सध्या अस्तित्वात असलेली शीतगृहांची साखळी कार्यक्षम आहे. यात अतिरिक्त लसींचा साठा ठेवता येईल, असे आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.