‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

0
429

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतर्कतेचा इशारा दिला असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर राजेश टोपे यांनी ट्वीट करून आपल्या आवाजातील बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची माहिती दिली आहे.

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजेश टोपे यांनी ट्विट करत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, व्हायरल झालेल्या क्लिपमधील आवाज माझा नाही.  मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र, त्या क्लिपमधील आवाज माझा नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.