राशिवडे परिसरात आरोग्य विभागाची ‘लस आपल्या दारी’ अभियान…

0
101

राशिवडे (प्रतिनिधी) : आरोग्य विभागामार्फत लस आपल्या दारी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. राशिवडे परिसरात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी घर टू घर सर्व्हे करून ज्यांनी लस घेतली नाही अशा नागरिकांचे प्रबोधन करून लसीकरणाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काही नागरीक चुकीच्या माहितीमुळे लसीकरणापासून बाजूला होताना दिसत आहेत. त्यांना योग्य माहिती देऊन लसीकरणासाठी तयार करताना आरोग्यकर्मचाऱ्यांची दमछाक उडताना दिसते आहे.