शाहूवाडी (प्रतिनिधी) : स्वराज्य प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनानिमित्त शाहूवाडीमध्ये २० दिव्यागांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. त्याचबरोबर शेळकेवाडी येथील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येतात. दरम्यान, आज सुमारे २० दिव्यांगांची मोफत रक्त साखर तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. दरम्यान शेळकेवाडी येथील गरजू कुटुंबाला वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंकारी व अल्फोन्सा कोव्हिड सेंटरचे डॉ. संदीप पाटील यांच्या हस्ते  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. झंजार माने, सचिन चौगले, रोहित दिंडे, सुरज नाईक, प्रा.बाजीराव वारंग, संतोष बावकर, कृष्णात सोरटे आदी उपस्थित होते.