प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवणाऱ्याचा प्रियकराचा मृत्यू…

0
155

मुंबई (प्रतिनिधी) : लग्नाला नकार दिल्याने रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी मिठी मारल्याने प्रियकराचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेली प्रेयसी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना मुंबईतील जोगेश्वरी पूर्व भागातील मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दील घडली. विजय खांबे (मयत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आहे. जोगेश्वरी पूर्व मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गांधीनगरमध्ये पीडित तरूणी राहत होती. मयत तरुण आणि प्रेयसी या दोघांचे जवळपास अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विजयला पीडित तरुणीशी लग्न करायचे होते. मात्र, विजयला दारुची सवय असल्यामुळे तिच्या घरच्यांकडून विरोध होता. पण विजय वारंवार तरुणीचा छळ करत होता. कंटाळून प्रेयसीने विजयशी प्रेमसंबंध ठेवण्यास आणि लग्न करण्यासही नकार दिला होता. त्यामुळे विजय संतप्त झाला होता.