त्याला लाज वाटली पाहिजे : अमेरिकेतील आंदोलनावर शिवसेना खासदाराचा संताप

0
99

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून जोरदार राडा केला. या सर्व घटनाक्रमामध्ये आंदोलकांपैकी एकाच्या हातात भारताचा तिरंगा झेंडा दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरुन शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे.

जो कोणी भारतीय झेंडा फडकवतोय त्याला लाज वाटली पाहिजे. दुसर्‍या देशात सुरू असलेल्या हिंसक आणि गुन्हेगारी कृतीत सहभागी होण्यासाठी आमचा तिरंगा वापरू नका, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला आहे. तर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनीही ट्विटरद्वारे, तिथे भारताचा झेंडा का आहे? असा सवाल केला आहे. ही एक अशी लढाई आहे ज्यामध्ये आपण सहभागी होण्याची नक्कीच आवश्यकता नाही, असे गांधी यांनी म्हटले आहे.