नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात दिल्लीत बैठक पार पडली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, सन २०१० मधील ते पत्र कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात लिहिलेले होते. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईने वाचायला हवे होते.

सन २०१० मधील त्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर मौन सोडले आहे. कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात ते पत्र लिहिल्याचे शरद पवारांनी सांगितले. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईने वाचायला हवे होते, असेही पवार म्हणाले आहेत. काल या पत्राचा दाखला देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तेव्हापासूनच या पत्रावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अखेर शरद पवार यांनी मौन सोडले असून टीका करणाऱ्यांचे कानही टोचले आहेत.