बीडशेड येथे एचडीएफसी बँकेची नवीन एटीएम सेवा सुरु…

0
42

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : ग्राहकांना अधिक उत्कृष्ट सेवा मिळावी. यासाठी एचडीएफसी बँकेने करवीर तालुक्यातील बीडशेड येथे नवीन एटीएम सेवा सुरु केली आहे. याचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विश्वास पाटील म्हणाले की, एचडीएफसी बँकेने नेहमीच ग्राहकांचे हित जोपासले आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी बँकेने विविध योजना राबविल्या आहेत. बीडशेड ही ग्रामीण भागातील मोठी व्‍यापारपेठ आहे. या सुविधेचा व्‍यापारी, ग्राहक, शेतकरी त्‍याचबरोबर आसपासच्‍या १५ ते २० गावांना लाभ होणार असल्याचे सांगितले.

यावेळी विरशैव बँकेचे चेअरमन अनिल सोलापूरे, कुंभी कारखान्याचे संचालक दादासो लाड, उत्तम वरुटे, एचडीएफसी कोल्हापूर एरिया हेड अर्जुन काळे, विजय कांबळे,  विजय कराडी, संजय पाटील, के. वाय. पाटील, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.