पन्हाळा येथील हजरत पीर शहादद्दीन खतालवली दर्गा उरूस भाविकांसाठी रद्द

0
334

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान हजरत पीर शहादद्दीन खतालवली दगाहर सादोबा यांचा उरूस दि. सोमवार ८ ते गुरुवार ११ मार्च कालावधीत होत आहे. या उरुसास भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा आणखी प्रसार होण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी हजरत पीर शहादद्दीन खतालवली उरुस भाविकांसाठी रद्द करण्यात आला आहे. मात्र परंपरागत धार्मिक विधी रीतीरिवाजाप्रमाणे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करणेत येणार आहेत. तसेच ११ रोजी होणारा महाप्रसादही रद्द करण्यात आला आहे. धार्मिक कार्यक्रम सोडून इतर कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती दर्गाहचे ट्रस्टी अब्दुलसत्तार मुजावर व  उरूस कमिटी सदस्य सद्दाम मुजावर यांनी दिली.