मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा पार पडला. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.

मल्हार नार्वेकर हे उच्च शिक्षित आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यांचे वडील राजेश नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. नार्वेकर हे कर्तव्यदक्ष आणि मितभाषी अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.