गारगोटी दि.२३(प्रतिनिधी)  : भुदरगड तालुक्यातील कुर कोल्हापूर गारगोटी रस्त्यावरील मुख्य वस्तीचे व बाजारपेठेचे गाव आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कुर गावातील वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून रस्त्यावर आले.  त्यामुळें गारगोटीकडे होणारी वाहतूक बंद आहे. तसेच पहिल्यांदाच राजिगरे गल्ली पर्यंत पुराचे पाणी पोहचले आहे. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

२०१९ मध्ये आलेल्या भीषण पुरामध्ये पाणी पाटील गल्ली व ब्राह्मण गल्लीपर्यंत पोहचले होते. त्यामानाने यावर्षीचा पाऊस व पूरस्थिती अधिकच आहे. त्यामूळे रजिगरे गल्ली मध्ये पाणी शिरल्याने कूर गावाचे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. पाटील गल्ली व ब्राह्मण गल्लीतील कुटुंबे मराठी शाळा कूर व श्री राम मंगल कार्यालयात स्थलांतरित केले गेले आहेत. या पुरामध्ये प्रापंचिक साहित्याचीच हानी झाली आहे. पण कोणतीही जीवितहानी झाली नाही लोकांना स्थलांतर करताना प्रापंचिक साहित्याची ने-आण करण्यास मावळा प्रतिष्ठान च्या युवकांनी मदत केली.