कुंभोज येथे गणेशोत्सवासाठी हातकणंगले पोलीस ठाण्याची बैठक पार…

0
104

कुंभोज (प्रतिनिधी) : हातकलंगले तालुक्यातील कुंभोज येथे गणेशोत्सव शांततेत आणि कायद्यांचे पालन करत साजरा व्हावा. यासाठी आज (मंगळवार) हातकणंगले पोलीस ठाणे आणि कुंभोज येथील गणेश मंडळांची बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि कायद्याच्या नियमांवलीचे पालन करीत साजरा करावा. तसेच यावेळी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करत शांततेत मिरवणूक पार पाडण्याचे आवाहनही पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले.

यावेळी किरण माळी, उपसरपंच अनिकेत चौगुले, ग्रा.पं. सदस्य आप्पासाहेब चौगुले, रावसाहेब पाटील, भरत भोकरे, अशोक आरगे, पोलीस पाटील मोहम्मद पठाण आदी उपस्थित होते.