कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष, कै. आनंदराव पाटील- चुयेकर यांनी दूध व्यवसायाच्या माध्यमातून गोरगरिबांचे संसार सुखी व समृद्ध केले.  प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिल्ह्यात खऱ्या अर्थाने धवलक्रांती रुजवली आणि ती यशस्वी केली, अशा शब्दांत ना. हसन मुश्रीफ यांनी चुयेकर यांच्या कार्याचा गौरव केला. आज (शनिवार) ना. मुश्रीफ यांनी कै. आनंदराव पाटील यांच्या चुये (ता. करवीर) या गावी भेट देऊन त्यांना सातव्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

ना. मुश्रीफ म्हणाले की, महाराष्ट्रासह देशाच्या तुलनेत दुग्धव्यवसाय कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला दिसतो. याच्या नागे कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांची धडपड, तळमळ आणि जिद्द आहे. दूध धंदा हा शेतीला जोडधंदा मानला जातो. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात मात्र दूध धंदाच मुख्य धंदा वाटावा एवढी व्याप्ती मोठी आहे. दुग्ध व्यवसायामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सुखी व समृद्ध आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण आपल्या जिल्ह्यात नाही.

या वेळी शशिकांत पाटील – चुयेकर, माणिक पाटील – चुयेकर, सुयोग वाडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.