हसन मुश्रीफ यांनी मुंबईत घेतली कोरोना प्रतिबंधक लस…

0
38

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (बुधवार) मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ही लस अत्यंत सुरक्षित आहे. राज्यातील नागरिकांना आवाहन करतो की, पात्र ठरलेल्यांनी लसीकरण जरूर करून घ्यावे. लसीकरण व कोविडमुक्तीसाठी प्रयत्नशील असलेल्या आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे आभार मानले पाहिजेत.