Published October 21, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील काही वर्षांपासून नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (बुधवार) पक्षत्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. यावर ‘खडसे सिर्फ झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है’ अशी सूचक प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलीय.

ना. मुश्रीफ यांनी म्हटले की, एकनाथ खडसे यांचे पक्षात आनंदाने स्वागत करतो. त्यांच्यामुळं खानदेशात पक्षाची ताकद वाढेल. आता पुढील काळात खडसे यांच्याप्रमाणेच पक्षाला कंटाळलेले अनेक नेते राष्ट्रवादीत येणार आहेत. त्याचप्रमाणे काठावरचे अनेकजण आमच्या पक्षात येतील. त्यामुळे ‘एकनाथ खडसे सिर्फ झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है !’ थोड्याच दिवसांत सर्वांना कळेल.

जरी खडसे यांनी माझ्याबरोबर भाजपमधील कोणताही खासदार, आमदार राष्ट्रवादीत जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी मुश्रीफ यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना वेग आला आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023