सुहासिनीदेवी घाटगे यांना धमकी देणाऱ्याचा शोध घ्या : आ. हसन मुश्रीफ

0 266

कागल (प्रतिनिधी) : श्रीमंत सुहासिनीदेवी विक्रमसिंहराजे घाटगे यांना फोनवरून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराला लवकरात लवकर शोधावे, अशी मागणी आ. हसन मुश्रीफ यांनी केली.  त्यांनी आज (बुधवार) याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिले.

निवदेनात म्हटले आहे की, समरजीतसिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घ्यावा, या कारणावरून ही धमकी दिल्याचे वृत्त माध्यमात छापून आले. आत्तापर्यंत कागल तालुक्यात कितीतरी टोकाचे राजकीय संघर्ष झालेले आहेत, परंतु असला घाणेरडा प्रकार या आधी कधीही घडलेला नव्हता, ही बाब अत्यंत निंदनीय व निषेधार्ह आहे. धमकीचा फोन करणाऱ्याचा नंबर डिलीट झाल्याचेही या बातमीत म्हटले आहे. दरम्यान, सायबर सेलकडून संबंधित ऑपरेटरकडून डाटा उपलब्ध करून या विकृत गुन्हेगाराचा शोध लावा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.  श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे राणीसाहेब यांना फोन करणारा गुन्हेगार अथवा त्यामागे असणारी शक्ती यांचा शोध तातडीने लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More