कळे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च शिष्यवृत्ती (इ. ५ वी) परीक्षेत  हरपवडे (ता.पन्हाळा) येथील दिशा कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी  घवघवीत यश संपादन केले. राज्यात  एक तर जिल्हा गुणवत्ता यादीत चार विद्यार्थी  चमकले आहेत. कुमारी उत्कर्षा सर्जेराव गुरव (हरपवडे) राज्यात ८ वी आली आहे. तिला ३०० पैकी २८० गुण मिळाले आहेत.

तर कोल्हापूर जिल्हा गुणवत्ता यादीत  कु. उत्कर्ष अनिल मोहिते (हरपवडे) २०७ वा कुमारी अपूर्वा सदाशिव चौगले (हरपवडे) २५४ वी आली आहे. तर रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत  कु. गणेश रामदास पाटील (बळपवाडी) १९ वा, कु. अथर्व विश्वास पाटील (गोगवे) ११८ वा  आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना क्लासचे मार्गदर्शक हेमंत खोडके,  वैशाली पाटील,  मानसी कुदळे, सुषमा खोडके यांचे मार्गदर्शन लाभले.