आसगाव येथील विवाहितेचा छळ : चौघांवर गुन्हा दाखल

0
207

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आसगाव येथील येथील विवाहितेला घर खरेदीसाठी पैशाची मागणी करून तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती सुनिल सर्जेराव कांबळे (वय २९), आजी सासू सिताबाई कृष्णात कांबळे (वय ७०), मावस सासरा उत्तम कांबळे, सासू भारती उत्तम कांबळेच्या विरोधात कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही फिर्याद पत्नी तेजस्वीनी सुनिल कांबळे (वय २७, रा. आसगाव, सध्या रा. कुलकर्णी कॉलनी, मणेर मळा, ता. करवीर) यांनी दिली आहे.

पोलिसांकडील माहितीनुसार, १५ नोव्हेबर २०१७पासून आज रोजीपर्यत तेजस्वीनी हिला आसगाव येथे पती सुनिल कांबळे आणि कुटुबियांनी मारहाण, शिवीगाळ करून मानासिक व शारिरीक त्रास दिला आहे. तसेच पती सुनील याने घर खरेदीसाठी माहेरून ५ लाख रुपये घेवून ये, त्याशिवाय घरी यायचे नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.