कुरुंदवाड पालिकेतर्फे ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली

0
26

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड नगरपरिषद व एस. के. पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘हर घर तिरंगा’ महारॅली काढण्यात आली होती. ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ च्या जोरदार घोषणा देत शहरवासीयांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार देशात यंदाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक देशवासीयाने दि १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रध्वज असलेला तिरंगा फडकवावा, असे आवाहन प्रशासक निखिल जाधव यांनी केले आहे.

पालिकेसमोरुन रॅलीला सुरवात करण्यात आली. छात्रसेना दलाचे सैनिक, पालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी शहरात रॅलीने फेरी मारून जोरदार घोषणाबाजी केली. विविध घोषणांमुळे परिसर राष्ट्रभावनेने भारावून गेला होते. या रॅलीचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. या रॅलीत पालिकेच्या कार्यालय निरीक्षक पूजा पाटील, संगणक अभियंता प्रणाम शिंदे, बांधकाम अभियंता योगेश गुरव, नगरसेवक उदय डांगे,नितीन संकपाळ, शशिकांत कडाळे, निशिकांत ढाले, नंदकुमार चौधरी आदी सहभागी झाले होते.