शिरोळ (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील युवा नेते राजू आलासे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, धावण्याच्या स्पर्धा, गरीब विधवा महिलांसाठी साडी वाटप आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. तर इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राष्ट्रवादीचे मदन कारंडे, नगरसेवक, इचलकरंजी शहरचे पोलीस उपअधीक्षक बी.बी. महामुनी यांनी राजू आलासे यांना शुभेच्छा देऊन  अभीष्टचिंतन केले.