हस्तकला विभागाला जिल्हा प्रशासनाकडून हवी ती मदत : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हस्तकला विभागीय कार्यालयास हवी ती मदत जिल्हा प्रशासनाकडून केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ते कोल्हापूरातील उद्योग भवन येथे हस्तकला विभागाच्या कार्यालयाचे उदघाटनप्रसंगी बोलत होते.

पूर्वी शाहूपुरी पहिल्या गल्लीतील असणारे कार्यालय आता उद्योग भवन येथे स्थलांतरित झाले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर हस्तकला विभागाचे सहायक निदेशक चंद्रशेखर सिंग यांनी या कार्यालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. सिंग यांनी, शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या या कार्यालयाला हस्त कारागिरांनी भेट द्यावी. त्यांच्यातील कलेला प्रोत्साहन देण्याबरोबरच अर्थार्जनही करून आत्मनिर्भर बनावे असे सांगितले.

यावेळी रितेशकुमार, मनोहर मीना, नवीनकुमार आदी उपस्थित होते.

Live Marathi News

Recent Posts

आजपासून घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर लागू..

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…

23 mins ago

नागपूरमध्ये केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन..

नागपूर (प्रतिनिधी) : दिल्लीत सुरू असलेल्या…

1 hour ago

दहावी-बारावीच्या परीक्षा उशिरा..?

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व…

2 hours ago