मुंबई (प्रतिनिधी) : संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संकटावर मत करण्यासाठी सध्या सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये, म्हणून प्रशासन काटेकोर पद्धतीने कारवाई करत आहे. त्याचप्रमाणे कोरोनावर लस शोधण्यासाठी नावाजलेल्या औषध कंपन्या दिवसरात्र एक करून काम करत आहेत.

मात्र मागील मागील काही दिवसांपासून या औषध कंपन्यांबाबतीत हॅकिंगच्या घटना घडत आहेत. हॅकर्सनं या फॉर्मा कंपन्यांवर नजर ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील फॉर्मा कंपन्यांवर सायबर हल्ले केले जात आहे. याआधी डॉक्टर रेड्डीज लॅबवर सायबर हल्ला झाल्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध फार्मा कंपनी लुपिनवरही सायबर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

१५ दिवसांपूर्वी डॉक्टर रेड्डीज लॅबवर हल्ला झाला होता. औषध उद्योगांशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पाश्चात्य देशातील प्रसिद्ध फॉर्मा कंपन्यांवर सायबर हल्ले झाले होते. मात्र भारतातील हा पहिलाच प्रकार आहे. हॅकर्स सध्या महत्त्वपूर्ण डेटाला लक्ष्य करत आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत असे सायबर हल्ले वाढत जातील. असे मानले जाते की, हॅकर्स औषधाविषयी माहिती मिळवण्यासाठी सायबर हल्ले करत आहेत.