सरवडे (प्रतिनिधी) :  आकनूर गावामध्ये काही दिवसांपूर्वी नवीन गटर्स बांधली होती. परंतु, झालेल्या पहिल्याच पावसात त्याच गटरचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने तिव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी  आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

आकनूर येथे काही दिवसांपूर्वी ठिकठिकाणी नवीन गटर्स बांधली आहेत.  परंतु, ग्रामपंचायतीने गावातील सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे हे सांडपाणी गल्ली-बोळातर तुडुंब भरून वाहत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी लेखी अर्ज दिले होते.

पण त्याकडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी, गावातील नागरिकांच्या घराभोवती सांडपाणी साचून दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरले आहे. यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायतीला आंदोलनाचा इशारा दिला आहे.