राशिवडे (प्रतिनिधी) : येथील बेघर वसाहतीमधील वरच्या गल्लीत नागरी सुविधा योजनेतून १३ लाख ५० हजार रुपयांच्या निधीतून रस्ता व गटर बांधण्यात आली आहेत. पण अयोग्यरीत्या गटरची बांधणी केल्यामुळे पाण्याचा निचरा होण्याऐवजी गटरात केरकचरा अडकला आहे. सांडपाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ग्रामस्थांनी सरपंच कृष्णात पोवार यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यावेळी त्यांनी पाहणी करून संबंधित ठेकेदाराला सदर गटरचे योग्य ते दुरुस्तीकरण करण्याची सूचना केली. संबंधित ठेकेदाराकडून माहिती घेतली असता त्यांनीही याविषयीची कार्यवाही लवकर करून ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही यासाठी लवकरच कार्यवाही करणार असल्याची माहिती दिली. यावेळी मोहन धुंदरे, प्रकाश धुंदरे, निवास डकरे, ग्रामसेवक शिवाजी आरडे आदी उपस्थित होते.