कोल्हापूर (प्रतिनिधी) : गुरुवर्य डी. डी. आसगावकर यांच्या १४ व्या स्मृतिदिना निमित्त १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. केशवराव भोसले नाट्यगृहात शैक्षणिक सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा गुरुवर्य डी. डी. आसगांवकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आ. चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. या  ट्रस्टच्या वतीने गेल्या ११ वर्षापासून आसगांवकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन केले जाते. तर गेल्या ३ वर्षापासून जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापकांना आसगांवकर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

दरम्यान, यंदा १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील शिक्षणप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आ. आसगांवकर यांनी केले आहे. यावेळी विश्वस्त डी. जी. घाटगे, संस्थेचे संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.