कासारवाडी येथे क्रॉपसॅप शेतीशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

0
165

टोप (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी विभाग, पेठवडगांव यांच्यावतीने क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळा वर्ग पार पडला. यात कृषीभूषण शेतकरी मच्छिंद्र कुंभार, कृषी पर्यवेक्षक महादेव जाधव, रामचंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी रब्बी हंगामात ज्वारी लागवडीची माहिती यामध्ये दिली. तसेच बी-बियाणे, गुणवत्ता पीक विमा, शेततळे, माती परीक्षण, भाजीपाला, फळबाग लागवड करताना घ्यावयाची काळजी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी हिंदुराव लुगडे,आनंदा खोत, नेताजी चेचरे प्रकाश खोत,कृष्णात खोत, शिवाजी खाडे, प्रकाश वागवे कृष्णात लुगडे, शेतकरी उपस्थित होते.