कृषी सुधारणा विधेयक, संधी आणि आव्हाने यावर मार्गदर्शन

0
76

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कृषी सुधारणा विधेयक २०२० संधी आणि आव्हाने या विषयावर १ ऑक्टोबर रोजी ‘गुगल मीट’वर अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे (रामेती), प्राचार्य उमेश पाटील यांनी दिली.

एक ऑक्टोबर रोज ११.३० ते दुपारी १.३० यावेळेत मार्गदर्शन होईल. या प्रशिक्षणाचा लाभ कृषी विभागातील अधिकारी / कर्मचा-यांबरोबरच शेतकरी बांधवासाठीही नि:शुल्क उपलब्ध आहे. विधेयकांचा शेतीमधील उत्पादनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंत दूरगामी आणि बहुआयामी परिणाम होणार आहेत. विधेयकामधील नेमक्या तरतुदी आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन होईल. या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आवश्यक link आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याकडून उपलब्ध करुन घ्यावी. अधिक माहितीसाठी ०२३१ – २९५०१७४ या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here