पालकमंत्र्यांची गगनबावडा तालुक्यातील पुरग्रस्त गावांना भेट…

0
189

साळवण (प्रतिनिधी) :  गगनबावडा तालुक्यामध्ये जुलै महिन्यामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अंदूर ते धुंदवडे नर्सरीनजीक रस्ता जवळपास अर्धा किलोमीटर जमीन दुभंगल्याने पंधरा फूट खचला आहे. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शनिवार) पाहणी केली.

यावेळी पालकमंत्र्यांनी, या रस्त्याची तांत्रिक पाहणी करण्यासाठी सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे पथक लवकरच भेट देणार आहे. तत्पूर्वी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला उद्यापासूनच तात्पुरता रस्ता करण्यासाठी पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या. तसेच या इन्स्टिट्यूटच्या पथकाने पाहणी केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार भविष्यामध्ये या पद्धतीची घटना घडू नये यासाठी कायमस्वरूपीची उपाय योजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर,गगनबावडा तहसीलदार संगमेश कोडे, वैभववाडी तहसीलदार रामदास झळके, जि. प. सदस्य बजरंग पाटील, भगवान पाटील, पं.स. सभापती संगीता पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले, गोकुळ संचालक बयाजी शेळके, गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील आदी उपस्थित होते.