Published October 24, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज पाटील यांचा ‘अजिंक्यतारा’ येथे महानगरपालिका कर्मचारी संघाच्या वतीने आज (शनिवार) सत्कार करण्यात आला.

महापालिकेच्या रोजदारी कामगारांना कायम करण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, आशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. या वेळी महापालिकेचे काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे, उपाध्यक्ष काका चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, सहसचिव अजित तिवले यांच्यासह कर्मचारी संघाच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य, कामगार उपस्थित होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023