पालकमंत्री सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह

0
1604

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल आज (मंगळवार) पॉझिटिव्ह आला आहे. मंत्री पाटील नुकतेच परदेश दौऱ्यावरून कोल्हापुरात दाखल झाले आहेत. याबाबतची माहिती पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुकवर पोस्ट टाकून दिली आहे.  

माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन, असे मंत्री पाटील यांनी आपल्या पोस्ट म्हटले आहे.