पालकमंत्र्यांच्या हस्ते कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन…

0
305

कसबा बावडा (प्रतिनिधी) : गेले दहा वर्षे चर्चेत असणाऱ्या कसबा बावडा येथील २० लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आज (रविवार) सायंकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपकडून विकसित करण्यात आलेल्या नागरी सुविधा केंद्र, बावडा-कदमवाडी रस्ता, चॅनेल कामाचा शुभारंभही करण्यात आला.

यावेळी खासदार प्रा.संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील,आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर,माजी महापौर स्वाती यवलूजे, निलोफर आजरेकर, माजी स्थायी सभापती डॉ संदीप नेजदार,श्रावण फडतारे, नगरसेवक अशोक जाधव, माजी नगरसेविका माधुरी लाड, श्रीराम सोसायटीचे सभापती धनाजी गोडसे, संतोष ठाणेकर, अभिजित जाधव उपस्थित होते.