कोल्हापूर (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री ना. दीपक केसरकर हे दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आज (शनिवार) आले आहेत. कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या वतीने पालकमंत्री दीपक केसरकर यांचे छ. ताराराणी चौकात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना जिंदाबाद, जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी केली.

यावेळी खा. धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, शिवसेना महानगर समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, रमेश खाडे, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, शहर समन्वयक सुनील जाधव, जिल्हा युवा अधिकारी अॅड.चेतन सुदर्शन शिंदे, शहर युवा अधिकारी पदावर पियुष मोहन चव्हाण, शहर युवा सरचिटणीस सुनील शिंदे आदी उपस्थित होते.