कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे विलासराव देशमुख यांना अभिवादन

0
83

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज (शनिवार) अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संध्या घोटणे, करवीर तालुका अध्यक्ष शंकरराव पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, तौफिक मुलाणी, जिल्हा सचिव संजय पवार-वाईकर, संपत पाटील, सुलोचना नाईकवडे, प्रदीप चव्हाण, विक्रम जरग, पूजा आरडे, उज्ज्वला चौगले, सचिन घोरपडे आदीसह जिल्हा व शहर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.